भुशी डॅम धबधब्यात ५ जण वाहून गेले…
पुणे – लोणावळ्यामधील भुशी डॅम्पच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅम परिसरात वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल येथून अन्सारी कुटुंब वाहून गेले. वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून, अद्याप एकजण बेपत्ताच असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी अन्सारी परिवार भुशी डॅम्पवर पर्यटनासाठी आला होता. जंगलातून येणाऱ्या बॅक वॉटरवरील धबधब्यावर अन्सारी परिवार पाण्याचा आनंद घेत होता. तेव्हा धबधब्यात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्यात दहाजण अडकले होते. त्या पैकी पाच जणांना बाहेर काढण्यात यश आले तर पाच जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. वाहून गेलेल्या पाच जणांपैकी चौघांचे मृतदेह सापडले असून, अद्याप एकजण बेपत्ताच असल्याची माहिती समोर आली आहे.