अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास सश्रम कारावास…
dombivali – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शशिकांत रामभाऊ सोनवणे याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.ए.डी.हरणे यांनी पॉक्सो कलमांतर्गत दोषी ठरवत २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सन २०१७ मध्ये आरोपी शशिकांत याने एका ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी पिडीतेच्या कुटुंबीयांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
त्याअनुषंगाने रामनगर पोलीसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे शशिकांत रामभाऊ सोनवणे अटक करून त्याची पोलीस कस्टडी घेऊन तपास चालू केला. सदर गुन्हयाचे तपास अधिकारी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या एस. सुर्यवंशी यांनी कसोशीने तपास करून आरोपी शशिकांत रामभाऊ सोनवणे यांस अटक करून त्याच्याविरूध्द सबळ व भरपुर पुरावा जमा करून न्यायालयात वेळेत दोषारोप पत्र सादर केले. सदर गुन्हयातील आरोपी शशिकांत रामभाऊ सोनवणे यास न्यायाधिश, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, कल्याण यांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकून आरोपी विरूध्द सबळ पुरावा झाल्याने सुनावणी दरम्यान भा.द.वि. क. ३७६ (अ) (ब) या कलमाकरीता २० वर्षे सश्रम कारावास व २०,०००/- रूपये द्रव्य दंड, दंड न भरल्यास १ महिना साध्या कारावासाची शिक्षा, तसेच भा.द.वि.क. ३६३ या कलमा करीता ३ वर्षे सश्रम कारावास व ३,०००/- रूपये द्रव्य दंड, दंड न भरल्यास १ महिना साध्या कारावासाची अशी शिक्षा ठोठावली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी तपास अधिकारी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या एस.सुर्यवंशी, कोर्ट पैरवी अंमलदार महिला पोलीस हवालदार तेजश्री शिरोळे व पोलीस अंमलदार बाबुराव चव्हाण, समन्स अंमदार पोलीस हवालदार संपत खैरनार व पोलीस नाईक अरूण कोळी यांनी केली आहे.