महाराष्ट्र
दीक्षाभूमीच्या अंडरग्राउंड पार्किंग प्रकल्पाला विरोध…
नागपूर – दीक्षाभूमी येथील भूमिगत पार्कींगला आंबेडकरी संघटनांनी जोरदार विरोध करत आंदोलन केले असल्याची माहिती समोर आली आहे.
या भूमिगत पार्कींग योजनेमुळे स्तूपाला धोका निर्माण होऊ शकतो असे संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवरील बांधकामाला विरोध करत भूमिगत पार्किंगचे बांधकाम सुरु असलेल्या जागेवर हल्लाबोल केला आणि जोरदार आंदोलन सुरु केले होते.
दरम्यान, पार्किंगच्या बांधकामाची तोडफोड झाल्यानंतर जनभावना लक्षात घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांधकामाला स्थगिती देत असल्याची घोषणा विधानसभेत केली.