डोंबिवली
अग्निशस्त्रासह काडतुसे बाळगणारा गजाआड…

डोंबिवली – बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्रासह काडतुसे बाळगणाऱ्यास मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अंकुश राजकुमार केशरवानी असे याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेश राळेभात आणि त्यांचे पथकाने कल्याण-शिळ रोड, गोलवली, डोंबिवली पूर्व येथून अंकुशला अटक केली.
तसेच त्याच्याकडून पोलिसांनी १ लोखंडी धातुचा गावठी बनावटीचा कट्टा (अग्नीशस्त्र) व ६ काडतूस, २ मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला.