डोंबिवली

कल्याण शीळ रोडवर वाहनात बिघाड झाल्याने वाहतूक कोंडी…

kalyan – कल्याण शीळ रोडवर (१९ जून २०२४) सकाळच्या सुमारास एका ट्रकमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक कोंडी झाली असल्याची माहिती कोळसेवाडी वाहतूक उप-विभागाने दिली आहे.

आज सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वाहन क्रमांक MH48 AG 7408 हे १४ चाकी सिमेंट ब्लॉक ने (३६ टन लोडेड ) भरलेले वाहन पाटा तुटल्याने मुख्य वाहतुकीच्या रोडवर, कल्याण शीळ रस्ता कल्याण कडून शिळफाट्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर विद्यानिकेतन कट, मानपाडा, डोंबिवली पूर्व येथे बंद पडलेला होता. त्यामुळे या परिसरात फार मोट्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सकाळच्या सुमारास गॅरेज चालू नसल्याने सदरचा ट्रक रस्त्याच्या बाजूला घेण्यासाठी वाहतूक विभागाने हायड्रा क्रेन बोलावून ट्रक रस्त्याच्या बाजूला करून घेतला. त्यादरम्यान, वाहतूक विभाग सदरच्या परिसरात वाहतूक नियमन करीत होते.

तसेच सदर वाहतूक कोंडी मेट्रो -१२ च्या कामामुळे झाली नव्हती, मेट्रो १२ प्रकल्पाकडून वाहतूक नियमनासाठी वार्डन उपलब्ध करून घेतलेले आहेत ते देखील नियमितपणे वाहतूक नियमनाचे काम करत असल्याचे स्पष्टीकरण वाहतूक विभागाने दिले आहे.        

दरम्यान याप्रकरणी सदर ट्रकवर मो.वा.कायदा कलम 130(1)/177, 190(1)/177 अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page