देश

पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात…

पश्चिम बंगाल – पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. सियालदहकडे जाणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या धडकेमुळे कांचनजंगा एक्स्प्रेसच्या अनेक बोगी रुळावरून घसरल्या. यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले असून, ५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आगरतळा ते सियालदहला जाणारी ट्रेन कांचनजंगा एक्स्प्रेसला मागून मालगाडीने धडक दिल्यामुळे अपघात झाला. एनजेपी ते सियालदह या मार्गावर सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपानी स्टेशनजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे मागील तीन डब्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page