६५ वर्षीय महिलेची हत्या करणाऱ्यास विष्णुनगर पोलिसांनी ६ तासात केली अटक…
डोंबिवली – एका ६५ वर्षीय महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीस अवघ्या ६ तासात विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. यश सतीश विचारे असे या २८ वर्षीय आरोपीचे नाव आहे. तर आशा रावकर असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, डोंबिवली पश्चिमेतील वसंत निवास बिल्डींग येथे राहणाऱ्या महिलेची हत्या करुन तिच्या गळयातील माळ व कानातील कर्णफुले चोरी झाली असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करून, मिळालेल्या माहितीच्या आधारे यश सतीश विचारे याला अटक केली.
त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याला मोबाईल मध्ये बेटिंग लोटस ३६५ या साईट वर क्रिकेटचा ऑनलाईन जुगार खेळण्याचा नाद असल्याने व त्यामुळे त्यावर ६०,०००/- रुपये चे कर्ज झाल्याने सदरचे कर्ज भरणेसाठी त्याने त्याच्या बिल्डींगमध्ये राहणाऱ्या आशा रावकर हिचे सोने काढून घेण्याचा प्लॅन करून तिची हत्या केली आणि तिच्या अंगावरील सर्व सोन चोरी केले.
सदरची यशस्वी कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण, दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३. कल्याण सचिन गुंजाळ सहायक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग, डोंबिवली सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार, पोनिरी (गुन्हे) गहिनीनाथ गमे, सपोनि सपोनि सचिन लोखंडे, पोउपनिरी दिपविजय भवर, पोउनि देशमुख, पोहवा जमादार, पोहवा पाटणकर, पोहवा भोसले, पोना भोई, पोहवा गवळी, पोहवा नागपुरे पोहवा मोरे, पोहवा पाटील पोशि साबळे, पोशि रायसिंग यांनी केली आहे.