महाराष्ट्र
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द…

पुणे – पुणे अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळाने मोठा निर्णय दिला आहे. अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून आता त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपीची १४ दिवसांसाठी बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. म्हणजेच आता हा आरोपी 5 जून पर्यत बाल सुधारगृहातच राहणार आहे.
दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवत दोन जणांचे बळी घेतलेल्या या आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला आहे. तसेच अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही हे त्या सुधारगृहात ठरणार आहे. असा निकाल बाल न्याय मंडळाने दिला आहे.