महाराष्ट्र
विशाल अग्रवाल यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न…

पुणे – हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
विशाल अग्रवाल यांना कोर्टात सादर करण्यासाठी पोलीस घेऊन आले असता, वंदे मातरम संघटनेकडून विशाल अग्रवाल यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे विशाल अग्रवाल बचावला.
दरम्यान, या घटनेमुळे सत्र न्यायालयाबाहेर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.