डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट…

डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीमध्ये एका कंपनीत मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. एमआयडीसी फेज दोनमध्ये हा स्फोट झाल्याचं कळतंय. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. स्फोटामुळे आजूबाजूच्या घराच्या काचा फुटलेल्या आहेत. तसेच गाड्यांच्या काचाही फुटल्या आहेत. धुराचे लोट या परिसरात पसरले आहेत. स्फोटामुळे डोंबिवलीकरांमध्ये भितीचे वातावरण आहे.
दरम्यान, डोंबिवलीत या आधीही अशा वारंवार घटना घडल्या आहेत. जेव्हा जेव्हा अशा घटना घडल्या त्यावेळी तेथील स्थानिक प्रतिनिधींनी कंपन्या स्थलांतरित करण्यात येतील अशी आश्वासन दिली आहेत. पण परिस्थिती जैसे थे च आहे. वारंवार अशा जीवघेण्या घटना घडूनही येथील स्थानिक प्रशासन याची गांभीर्याने दखल घेत नाहीये. प्रत्येकवेळी डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे.