राज्यातील बारावीचा निकाल जाहीर…

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.
यंदा इयत्ता बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. सर्वाधिक जास्त 97.51 टक्के निकाल कोकण विभागाचा तर सर्वाधिक कमी 91.95 टक्के निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पत्रकार परिषदेत बोर्डाकडून निकाल जाहीर करण्यात आला. कोकण, पुणे, कोल्हापूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, लातूर, नागपूर, मुंबई या ९ विभागाचा निकाल जाहीर झाला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या निकालाचा टक्का वाढला आहे. पुणे 94.44 टक्के, नागपूर 92.12 टक्के, संभाजी नगर 94.08 टक्के, मुंबई 91.95 (सर्वात कमी), कोल्हापूर 94.24 टक्के, अमरावती 93 टक्के, नाशिक 94.71 टक्के, लातूर 92.36, कोकण 97.51 टक्के (सर्वात जास्त)