पुणे अपघात प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई…

पुणे – पुणे हिट अँड रन प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोझी बार आणि ब्लॅक पबवर मोठी कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोझी आणि ब्लॅक हे दोन्ही पब सील केले आहेत. राज्य उत्पादक शुल्क विभागाने पबमध्ये जाऊन कारवाई केली. नियमबाह्य पध्दतीने मद्य विक्री केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने पब सील करत मोठी कारवाई केली आहे.

पुण्यात दारु पिऊन पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणानं दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्या तरुणानं कार चालवण्यापूर्वी रात्रभर पुण्यातल्या कोझी बारमध्ये मित्रांसोबत पार्टी केल्याचं CCTV फुटेजमधून उघड झालं होतं. त्या तरुणाच्या टेबलवर अनेक दारुच्या बाटल्या दिसत होत्या.
दरम्यान, या प्रकरणात पबचे मालक आणि व्यवस्थापक यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर आणि संदीप सांगळे या तिघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.