महाराष्ट्र
महाराष्ट्रात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 48.66 टक्के मतदान…

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज (दि.20) मुंबईतील 6 जागांसह राज्यातील 13 मतदारसंघात मतदान सुरु आहे.
हे मतदान सकाळी 7 वाजल्यापासून सूरू झाले. दरम्यान, पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदार संघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 48.66 टक्के मतदान झाले आहे.
कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान?
भिवंडी – 48.89 टक्के
धुळे – 48.81 टक्के
दिंडोरी – 57.06 टक्के
कल्याण – 41.70 टक्के
उत्तर मुंबई – 46.91 टक्के
उत्तर मध्य मुंबई – 47.32 टक्के
उत्तर पूर्व मुंबई – 48.67 टक्के
उत्तर पश्चिम मुंबई – 49.79 टक्के
दक्षिण मुंबई – 44.22 टक्के
दक्षिण मध्य मुंबई – 48.26 टक्के
नाशिक – 51.16 टक्के
पालघर – 54.32 टक्के
ठाणे – 45.38 टक्के