महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार… 

पुणे – महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी २१ मे रोजी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून करण्यात आली आहे.

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती.

परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात करण्यात येणार आहे.

अधिकृत संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहेत.

१. mahresult.nic.in

२. http://hscresult.mkcl.org

३. www.mahahsscboard.in

४. https://results.digilocker.gov.in

५. http://results.targetpublications.org

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page