ड्राय डे च्या दिवशी दारू विक्री करणाऱ्यास कल्याण गुन्हे शाखेने केली अटक…
कल्याण – आज १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन (ड्राय डे) या दिवशी दारू विक्री करणाऱ्यास कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. कैलास कुऱ्हाडे असे याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून वेगवेगळ्या नामांकित कंपनीच्या सिलबंद दारुच्या बाटल्या व रोख रक्कम असा एकूण १०,३०५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
आज १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन (ड्राय डे) असल्यामुळे दारू विक्रीवर बंदी असते त्यामुळे परिमंडळ ३ कल्याण-डोंबिवली भागात कोणत्याही प्रकारची दारू विक्री होत असल्यास कारवाई करण्याचे आदेश कल्याण गुन्हे शाखा युनिट ३ चे व.पो.निरी. नरेश पवार यांनी गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकास दिले होते.
त्याअनुषंगाने पोहवा दत्ताराम भोसले यांना मिळालेल्या बातमीवरून पोलिसांनी कोळशेवाडी पोलीस ठाणे हद्दीत विजयनगर नाक्याजवळ तिसगाव कल्याण पूर्व येथे कैलास कुऱ्हाडे यास दारू विक्री करत असताना अटक केली. आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या नामांकित कंपनीच्या सिलबंद दारुच्या बाटल्या व रोख रक्कम असा एकूण १०,३०५/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची यशस्वी कामगिरी कल्याण गुन्हे शाखा युनिट ३ चे व.पो.निरी. नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.दत्ताराम भोसले, विश्वास माने, गुरुनाथ जरग, दिपक महाजन, गोरक्ष शेकडे यांनी केली आहे.