कळवा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार,पोउपनिरी एसीबीच्या जाळ्यात…

Thane – कळवा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार आणि पोउपनिरी यांना १,९०,०००/-रू. लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी ताब्यात घेतले आहे. तुषार पोतेकर (पो.उपनिरी), माधव दराडे (पोलीस हवालदार) अशी या दोघांची नावे आहेत.

याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रारदार यांचा अल्युमिनीयम पट्टी बनवण्याचा कारखाना वाडीवरे, नाशिक येथे आहे. त्यांनी त्यांच्या कंपनीतील अल्युमिनीयमच्या पट्ट्या (माल) मुंबई येथे विक्रीकरीता टेम्पोमधून पाठवला होता. सदरचा टेम्पो कळवा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी मालासह पकडून ठेवल्याने तक्रारदार हे त्यांचा माल सोडवण्यासाठी कळवा पो.स्टे. येथे गेले असता तेथील पोहवा दराडे यांनी तक्रारदार यांना त्यांचा माल आणि टेम्पो सोडवण्यासाठी स्वतः करीता तसेच तपास अधिकारी पोउपनि पोतेकर व वरिष्ठ पो.नि. उतेकर यांना देण्याकरीता एकूण दोन लाख रुपयांची मागणी करून, पैसे दिले नाही तर माल आणि गाडी पोलीस ठाणे येथे सडत राहील अशी धमकी दिली आणि दोन लाख रुपये घेऊन येण्यास तक्रारदार यांना सांगितले.
दरम्यान, तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे येथे याबाबत तक्रार केली. त्याअनुषंगाने एसीबीने पडताळणी केली असता पोहवा माधव दराडे यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे आणि पोउपनि तुषार पोतेकर यांनी त्यास प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाल्यावरून एसीबीने माधव दराडे यांना तकारदार यांच्याकडून कळवा पोलीस ठाणे समोर १,९०,०००/-रू. लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. तसेच तुषार पोतेकर (पो.उपनिरी), माधव दराडे (पोलीस हवालदार) या दोघांनाही ताब्यात घेतले.