ठाणे
ठाण्यात देशी बनावटीच्या पिस्टलसह एकास अटक…

ठाणे – ठाण्यातील मानपाडा परिसरातून बेकायदेशिर देशी बनावटीच्या पिस्टलसह एकास कापुरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. रवि हनवते असे याचे नाव आहे.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सेंट सेव्हियर्स शाळेजवळ, जी.बी. रोड, मानपाडा येथून रवीला अटक केली. त्याच्याकडून १ देशी बनावटीचे पिस्टल आणि मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.