जनावरांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; ३० जनावरांची सुटका…
कल्याण – जनावरांची तस्करी करणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक करून ३० म्हशीच्या जातीचे पारडू/पारडे यांची सुटका केली. इकबाल हनीफ खान आणि जमीर मुस्तफा कुरेशी अशी या दोघांची नावे आहेत.
कल्याण आग्रा रोड मार्गे मुंब्रा ठाणे या ठिकाणी एका ट्रक मधून काही म्हशीच्या जातीची जनावर कत्तल करण्यासाठी व त्यांची खरेदी विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याची बातमी डिटेक्शन ब्राचं मधील पोलीस हवालदार सचिन साळवी यांना मिळाली होती. मिळालेली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लालचौकी आग्रा रोड कल्याण येथे सापळा रचून सदर ट्रक ताब्यात घेऊन एकूण ३० म्हशीच्या जातीचे पारडू /पारडे यांची सुटका केली. तसेच ट्रक ड्रायव्हर व क्लीनर इकबाल आणि जमीर याला अटक करून एकूण १८,१७०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
दरम्यान, जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले असून, गुन्ह्याचा पुढील तपास API नवनाथ रुपवते करीत आहे.
सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन इन्चार्ज API नवनाथ रुपवते, डीबी पथकातील पो. हवा सचिन साळवी, पो हवा प्रेम बागुल, पो.हवा परमेश्वर बाविस्कर, पो हवा रवी भालेराव, पो.हवा घुगे, पो.ना अरुण आंधळे, पो.ना फड यांनी केली.