मुंबई
अनिल देशमुखांची जेलमधून सुटका…

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अखेर आर्थर रोड जेलमधून सुटका झाली आहे. अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, आणि दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या कार्यर्त्यांनी यावेळी एकच जल्लोष केला.
देशमुख यांचा जामीन रद्द करण्याची सीबीआयची मागणी हायकोर्टाने फेटाळल्यानंतर अनिल देशमुख जेलमधून बाहेर आले आहेत. देशमुख यांच्यावर १०० कोटी वसूलीचा आरोप होता. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरू होता. अखेर ते जेलमधून बाहेर आले.



