महाराष्ट्र
लाचखोर वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…

रत्नागिरी – १८ हजाराची लाच घेताना एका वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांनी रंगेहात पकडले. डॉ. सुरेश दत्तात्रय कुराडे असे याचे नाव असून, वर्ग – २ उप जिल्हा रुग्णालय, दापोली, जि. रत्नागिरी येथे कार्यरत आहेत.
तक्रारदार यांच्या वडिलांचा शस्त्र परवाना नुतानिकरण करण्याचा होता, त्यासाठी तक्रारदार यांच्या वडीलांची वैद्यकीय तपासणी होऊन त्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असल्याने, सदर वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी डॉ. कुराडे यांनी २०,०००/- रु लाचेची मागणी करून तडजोडी अंती १८,००० /- रु लाच तक्रारदार यांच्याकडून स्वीकारताना डॉ. कुराडे यांना रंगेहात पकडण्यात आले.