महाराष्ट्र
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर भीषण अपघात…

पुणे – पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर भीषण अपघात झाला आहे. ७ ते १० वाहने एकमेकांना धडकली. खोपोली एक्झिट जवळ हा अपघात झाला. अपघातात ४ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु आहे.