ठाणे

चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले गजाआड…

कल्याण – सोनसाखळी चोरी करणाऱ्या दुकलीस कोळसेवाडी पोलीसांनी अटक केली. प्रदीप उर्फ सोनु विश्वकर्मा आणि वसीम अन्सारी अशी त्यांची नावे आहेत.

फिर्यादी दुर्गावती सिंग या मलंग रोड येथील एस्सार पेट्रोल पंपाच्या समोरील कट्टयावर बसलेल्या असताना मोटार सायकलवर आलेल्या २ इसमांनी येऊन फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांची चैन जबरदस्तीने खेचून ते मोटार सायकलवरून पळून गेले म्हणून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर दोघांना अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page