ठाण्यातून राहुल गांधींचे मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र…

ठाणे – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी मुंबईत दाखल होणार आहे तत्पूर्वी हि भारत जोडो यात्रा ठाण्यात येऊन धडकली. त्यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लबोल केला.
राहुल म्हणाले, केंद्र सरकार तुम्हाला म्हणते, आधी रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ, और भूके मर जावो’ केंद्रातील मोदी सरकार हे सामान्य जनतेसाठी नव्हे तर जनतेला लुटण्यासाठी काम करत आहे. म्हणूनच तर देशातील संसाधणे एकाच व्यक्तीला दिली जात आहेत. विमानतळं, बंदरं, केंद्रीय संस्था, यंत्रणा या सर्व एकाच व्यक्तीच्या इशाऱ्यावर चालत आहेत. ही व्यक्ती म्हणजे गौतम अदानी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी वेगवेगळे नाहीत, हे एकच आहेत.

सामान्य व्यक्तींच्या डोळ्यात धुळफेक करत त्यांचे लक्ष भरकटवले जाते आहे. जेणेकरुन मूळ प्रश्नांवर कोणीही बोलू नये. लोकांचे लक्ष भरकटवून त्यांना हवे ते निर्णय घेतले जात आहे. त्यामुळे तरुणांना नोकऱ्या नाहीत, उद्योगधद्यांमध्ये वाढ नाही, असे असतानाच हे सरकार अग्निवीर सारखी योजना घेऊन येते, अग्निवीर ही एक फसवी योजना आहे. ज्यामध्ये तरुणांना कोणत्याही प्रकारे निश्चित आणि हक्काची नोकरी मिळत नाही. चार लोकांना भरती करुन घेतले जाते. विशिष्ट कालावधी झाला की चारपौकी तीन लोकांना हकलून दिले जाते. हे सरकार कोणतीच योजना सामान्यांना डोळ्यासमोर ठेऊन राबवत नाही.

अयोध्येत राम मंदिर झाले. या सोहळ्याला सामान्य व्यक्तीना प्रवेश नव्हता. केवळ उद्योगपी, बडे सेलिब्रेटी, अभिनेते, खेळाडू आणि राजकीय नेत्यांनाच प्रवेश होता. सामान्यांचे सोडा या देशाचे राष्ट्रपती सामान्य आदिवासी महिला आहेत. त्यांनाही या सोहळ्याला निमंत्रण दिले नाही. केवळ महिला आहे आणि त्यातही त्या आदिवासी आहेत म्हणूनच त्यांना राम मंदिर सोहळ्यास निमंत्रण दिले नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. इलेक्ट्रोल बॉंडच्या माध्यमातून भाजपने पैसा कमावला आणि त्यातील काही पैसा राज्यातील सरकारे पाडण्यासाठी आणि आमदार फोडण्यासाठी वापरला असेही राहुल गांधी म्हणाले.