राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मुदतवाढ…
नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निकाल जाहीर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ दिली आहे. सुप्रीम कोर्टाने १५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
याप्रकरणात ३१ जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.परंतु, आता या प्रकरणी निकाल जाहीर करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
याबाबत झालेल्या सुनावणीत राहुल नार्वेकर यांचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, शिवसेनेतील आमदार अपात्रप्ररकणात विधानसभा अध्यक्ष व्यस्त होते. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी आमदार अपात्रप्रकरणातील वेळ पाळता आली नाही. राष्ट्रवादी आमदार अपात्रप्रकरणी कार्यवाही संपली आहे. परंतु, अध्यक्षांना आदेश देण्याकरता आणखी तीन आठवड्यांची आवश्यकता आहे. यावरून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे.