महाराष्ट्र
रेल्वेच्या हायटेन्शन लाईनवर मनोरुग्ण चढला…

नंदुरबार – रेल्वेच्या हाय टेन्शन लाईनवर एक मनोरुग्ण व्यक्ती चढला असल्याची घटना नंदुरबार रेल्वे स्थानकात घडली असून, वीज पुरवठा खंडीत करावा लागला आणि रेल्वे जागेवरच थांबल्या. भुसावळ ते सुरत दरम्यानची रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. सर्व रेल्वे जागेवरच थांबल्या. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले.
दरम्यान अथक प्रयत्नानंतर प्रशासनाला त्याला खाली उतरवण्यात यश आले. त्यानंतर रेल्वेचा वीजपुरवठा पुन्हा सुरू झाला आणि खोळंबलेली रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाली.