मुंबई

मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर कारवाई… 

मुंबई – मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर मंगळवार पासून कारवाई केली जाणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने २४ वॉर्डमध्ये अधिकारी नेमण्यात आले आहेत.

याबाबत वृत्त असे आहे कि, राज्यातील आस्थापने आणि दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली आहे. शिवाय  मुंबई पालिकेने देखील आणखी २ दिवस मुदत दिली होती. मराठी पाट्या लावण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, अजूनही अनेक दुकानदारांनी मराठी फलक लावले नसल्याने आता मुंबई महापलिका थेट कारवाईला सुरुवात करणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेच्या वतीने २४ वॉर्डमध्ये अधिकारी नेमण्यात आले आहेत. हे अधिकारी या वॉर्डमध्ये दुकानांची पाहणी करतील. ज्या दुकानांवर मराठीत पाट्या नसतील, ज्यांनी नियमांचे पालन केले नसेल त्यांना दंड ठोठावण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page