महाराष्ट्र
लाच घेताना उपकोषागार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…

रायगड – सहा हजार रुपयांची लाच घेताना उपकोषागार अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांनी रंगेहात पकडले. मारुती पवार असे याचे नाव असून ते उपकोषागार कार्यालय, माणगाव येथे कार्यरत आहेत.
तक्रारदार यांचे सेवानिवृत्ती नंतरचे सुधारित आश्वासित प्रगतीनुसार ग्रॅज्युटीची फरक रक्कम रुपये 45,050/- इतक्या रकमेचे बिल मंजूर करून बँक खात्यात जमा करण्याची मंजुरी देण्याकरता मारुती पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे रुपये 6,000/- लाचेची मागणी केली होती. हि रक्कम स्वीकारताना उपकोषागार कार्यालय माणगाव येथे मारुती पवार यांना एसीबीने रंगेहाथ पकडले.