महाराष्ट्र
नांदेडमध्ये २४ तासात २४ जणांचा मृत्यू…

नांदेड – शासकीय रुग्णालयात २४ तासात तब्बल २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मृतकांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश आहे.
वेळेत औषधांचा पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.