मुंबई
सीएनजी पीएनजीच्या दरात कपात…

मुंबई – सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्यात आल्याची माहिती महानगर गॅस लिमिटेडने दिली आहे.

मुंबई आणि उपनगरात सीएनजीच्या दरात ३ रुपयांची तर पीएनजीच्या दरात २ रुपयांची कपात करण्यात आली आहे. हे नवे दर २ ऑक्टोबर पासून लागू होणार असल्याचे महानगर गॅस लिमिटेडने सांगितले आहे. त्यानुसार आता मुंबईत सीएनजी ७६ रुपये तर पीएनजी ४७ रुपये दरात उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, घरगुती वापरामध्ये आणि वाहनांमध्ये नैसर्गिक वायूचे प्रमाण वाढावे यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे कंपनीने सांगितले आहे.