ठाणे

चालत्या कारला भीषण आग…

ठाणे – मुंब्रा बायपास रोड वर एका चालत्या कारला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही कार पनवेल वरून ठाण्याच्या दिशेला जात होती. मुंब्रा-बायपास रोडवर कार आल्यावर अचानक या कारने पेट घेतला. या गाडीमध्ये ७ जण होते. सुदैवाने कोणीतीही जीवितहानी झालेली नाही.

माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि कारला लागलेली आग त्यांनी विझवली. दरम्यान गाडीला आग लागण्यामागील कारण समजू शकलेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page