महाराष्ट्र
सातारा – वाई न्यायालय परिसरात गोळीबार…

सातारा – वाई न्यायालय परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली. ३ कुख्यात गुंडावर गोळीबार झाला असून सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, निखिल मोरे, अभिजीत मोरे अशी या तिघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या तिघांना वाई न्यायालयात आणले होते, त्यावेळी यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. दरम्यान, खंडणी प्रकरणी या तिघांना अटक कऱण्यात आली होती.