मुंबई
जबरी चोरी करणारे गजाआड…

मुंबई – जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली. अश्विन चंडालिया आणि विनायक ताम्हणकर अशी या दोघांची नावे आहेत.
ब्लॅक कॅफे, सहार रोड, अंधेरी पूर्व येथून फिर्यादी हे कामावरून घरी जात असताना एका गाडीवरून इसमांनी येऊन फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातून जबरदस्तीने रोख पाचशे रुपये काढून घेतले म्हणून फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे अश्विन चंडालिया आणि विनायक ताम्हणकर या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ५००/- रु. रोख, चाकू आणि स्कुटी असा एकूण ५०,५५०/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.