मुंबई
निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, ७० लाखांची रोकड जप्त…

मुंबई – निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. घाटकोपरच्या पंतनगरमध्ये एका कारमधून ७० लाख ३९ हजार रुपये जप्त केले असून, दोघांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्व्हिलन्स स्क्वाडने घाटकोपरच्या पंतनगरमध्ये एका कारमधून ७० लाखांची रोकड जप्त केली. तसेच याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी एक सीए आणि दुसरा मुंबईतील घाटकोपर भागातील पंतनगर येथील आयकर व्यवसायी आहे.
दरम्यान, ही रक्कम नवी मुंबईतील वाशी येथील एका विकासकाची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.