डोंबिवलीत शाळा-महाविद्यालय संवाद मेळावा संपन्न!…

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेत ‘शाळा-महाविद्यालय संवाद मेळावा’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अंमली पदार्थ जनजागृती व सायबर सुरक्षा या विषयावर आधारित हा मेळावा होता.
पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे सो, यांचे संकल्पनेतुन महाविद्यालयीन स्तरावरील प्राचार्य, ०५ प्राध्यापक, ०५ विद्यार्थी यांना सायबर गुन्हे सुरक्षा, अंमली पदार्थ जनजागृती याबाबत मार्गदर्शन करुन प्रशिक्षण देवुन त्यांचे मार्फतीने त्यांचे अधिपत्याखालील महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची मुळ संकल्पना डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी मांडलेली आहे. त्यामध्ये प्रत्येक शाळा महाविद्यालय यांनी महिण्यातुन ०२ वेळा सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून सायबर सुरक्षा, अंमली पदार्थ जनजागृती याबाबत माहिती देणे अपेक्षित आहे.

सदर संकल्पनेच्या अनुषंगाने शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी यांचेकरिता अंमली पदार्थ जनजागृती व सायबर सुरक्षा या विषयावर आधारित ‘शाळा-महाविद्यालय संवाद मेळावा’ दिनांक ०५/०८/२०२५ रोजी ब्लॉसम इंटरनॅशनल स्कुल ऑडीटोरिअम, ठाकुर्ली रेल्वे पुलाजवळ, डोंबिवली पूर्व येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास अतुल झेंडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण, सुहास हेमाडे, सहा. पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग, गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली पोलीस ठाणे तसेच डोंबिवली पोलीस स्टेशन हद्दीतील ३० शाळा, १२ महाविद्यालय यांचे प्राचार्य / मुख्याध्यापक, प्राध्यापक, १२ महाविद्यालयाचे प्रत्येकी ०५ विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी अभिषेक सोनार (सायबर तज्ञ), नितीन भोसले पोलीस उप निरीक्षक (नारकोटिक्स सेल, ठाणे शहर), जितेश व कल्पना मोरे, कॉज फाउंडेशन, ठाणे, विश्वनाथ बिवलकर, अध्यक्ष इगल ब्रिगेड, युवराज महाले, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग सी. आर.सी. प्रमुख, विवेक पाटील प्राचार्य, रॉयल महाविद्यालय, डोंबिवली पुर्व यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन प्रशिक्षण दिले.
प्रथम कार्यक्रमाची प्रस्तावना गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली पोलीस स्टेशन यांनी केली. त्यामध्ये त्यांनी सायबर सुरक्षेबाबत माहिती देवुन ओ.टी.पी. शेअर करु नका, अनोळखी अनोळखी लिंकवर क्लिक करुन नका, अनोळखी फोनवर आपली माहिती सांगु नका, कोणत्याही अमिषाला बळी पडु नका इत्यादी गोष्टी समजावल्या. तसेच अंमली पदार्थाबाबत जनजागृती करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

त्यानंतर प्रथम वक्ते अभिषेक सोनार (सायबर तज्ञ) यांनी उपस्थितांना सायबर गुन्हे, आर्टिफिशीयल इंटेलिजन्स याबाबत मार्गदर्शन करुन शाळा महाविद्यालयातील क्लार्क यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत सावध केले. त्यांनी काय करावे, काय करु नये याबाबत छोटीसी सायबर
पुस्तिका वाटप केली आहे. तसेच सायबर सुरक्षेसंदर्भाने ऑडीओ व व्हिडीओ प्रेझेंटेशनद्वारे समजावुन सांगितले. त्यामध्ये ओटीपी दुसऱ्याला सांगु नका, अनोळखी लिंकवर क्लिक करुन नका, अनोळखी फोनवर आपली माहिती सांगु नका, कोणत्याही अमिषाला बळी पडु नका इत्यादी गोष्टी समजावल्या.
व्दितीय वक्ते नितीन भोसले, पोलीस उप निरीक्षक नारकोटिक्स सेल, ठाणे शहर यांनी उपस्थितांना अंमली पदार्थांचे प्रकार, त्याची ओळख व त्याचे दुष्परिणाम याची सोप्या भाषेमध्ये माहिती दिली. तसेच अंमली पदार्थाच्या अधिन गेलेल्या समाजातील घटकांबाबत त्यांना आलेले गुन्हे तपासादरम्यानचे अनुभव कथन केले. तसेच उपस्थितांच्या मनातील प्रश्न व शंकाचे निरसन केले.
तृतीय वक्ते म्हणून विश्वनाथ बिवलकर, अध्यक्ष इगल ब्रिगेड यांनी पोलीस मित्र संकल्पनेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी समाजामध्ये वावरतांना दिसणाऱ्या बेकायदेशीर गोष्टींबाबत न घाबरता पोलीसांना माहिती देण्याबाबत तसेच पोलीस मित्र बनुन पोलीसांना सहकार्य करणेबाबत सुरु असलेल्या पोलीस मित्र प्रकल्पाबाबत माहिती दिली.
तृतीय वक्ते म्हणुन जितेश व कल्पना मोरे, कॉज फाउंडेशन, ठाणे तसेच त्यांचे सहकारी यांनी उपस्थितांना अंमली पदार्थाचा असलेला धोका तसेच युवा वर्गामध्ये अंमली पदार्थांच्या वाढणाऱ्या आकर्षणाबाबत असलेला धोका समजावून सांगितला तसेच महिला सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच अंमली पदार्थ व महिला सुरक्षेसंदर्भाने ऑडीओ व व्हिडीओ प्रेझेंटेशनद्वारे समजावुन सांगितले.
युवराज महाले, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, शिक्षण विभाग सी.आर.सी. प्रमुख व विवेक पाटील प्राचार्य, रॉयल महाविद्यालय, डोंबिवली पूर्व यांनी सदर योजनेच्या यशस्वीतेबद्दल मार्गदर्शन करुन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचा समारोप सुहास हेमाडे (सहा. पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग) यांनी केला त्यामध्ये त्यांनी सांगितले की, अंमली पदार्थ व्यसनापासुन दुर रहा, आपल्या मुलांवर लक्ष ठेवा, तो एकटा राहत असेल, पैसे मागत असेल, चिडचिडा झाला असेल, तर त्याच्याशी बोला, त्याचेकडे आपुलकीने चौकशी करा. याबाबत तसेच सायबर गुन्हे, महिला सुरक्षा याबाबत मार्गदर्शन करून सदर प्रकल्पास यशस्वी होण्यास शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र खेडकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. तसेच सुप्रसिद्ध सिने कलाकार सतिश नायकोडी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. त्यांनी आपल्या अमेझिंग वाणीतुन उपस्थितांची मने जिंकुन कार्यक्रमाचे सुरवातीपासुन शेवटपर्यंत मनोरंजन करुन उपस्थितांचा उस्ताव व्दिगुणित केला. सदर कार्यक्रमासाठी १२५ ते १५० प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.