कल्याणमध्ये ५ बांगलादेशी महिलांसह एकास अटक…

कल्याण – भारतात विनापरवाना प्रवेश केलेल्या ५ बांगलादेशी महिलांसह त्यांना आश्रय देणाच्या एका भारतीय नागरीकाला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली.

लुथफा बेगम जहाँगीर आलम, जोरना जलालमियाँ अख्तार, मासुमा जमीरउद्यीन, रितीका रघुनाब मंडल अशी या महिलांची नावे आहेत यात एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. तिलाही ताब्यात घेण्यात आले आहे. तर रघुनाथ उदय मंडल असे आश्रय देणाऱ्याचे नाव आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन, पश्चिम परिसरात काही बांगलादेशी महिला संशयास्पदरित्या वावरत आसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी एस.टी. डेपो, रिक्षा स्टॅन्ड परीसरात शोध घेतला असता त्याठिकाणी ५ महिला, १ इसम हे संशयास्पद स्थितीत फिरताना आढळून आले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.