महाराष्ट्र
अकोल्यात दोन गटात तुफान राडा…

अकोला – अकोल्यात दोन गटात तुफान राडा झाला. शहरातील जुने शहर भागातल्या हरिहरपेठ मध्ये दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. यात एकाचा मृत्यू झाला आहे.

एका व्यक्तीने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या राड्यात वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. तर काही ठिकाणी चारचाकी गाड्यांना आग लावण्याचाही प्रयत्न झाला.
दरम्यान, शहरात कलम 144 लागू करण्याचे आदेश देण्यात आले असून, परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. शहरात तणावपूर्ण शांतता आहे.