महाराष्ट्र
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात…

पुणे – पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर विचित्र अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. टेम्पो, कंटेनर आणि कार हि तीन वाहने एकमेकांवर आदळली.
या अपघातात कारने पेट घेतल्याने तिघांचा आगीत होरपळून मृत्यु झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंचरजवळ असलेल्या भोरवाडी येथे हा अपघात झाला. टेम्पो आणि कारमध्ये जोरदार धडक झाली. त्यानंतर टेम्पो कंटेनरवर धडकला. तर कार पेटली, त्यात कार संपूर्ण जळून खाक झाली आणि कारमधील तिघांचा मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोचले आणि जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले .