मुंबई
धनगर समाजाला धक्का; न्यायालयाने याचिका फेटाळल्या…

मुंबई – धनगर समाजाला अनुसूचित जाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, ही मागणी करणाऱ्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.

धनगर समाजाला अनुसूचित जाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, या सगळ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.
न्यायमूर्ती गौतम पटेल व न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने या याचिका फेटाळून लावल्या. तसेच धनगर आणि धनगड एकच नाहीत हे देखील स्पष्ट केले.