निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक…

भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार निलेश राणे यांची आज गुहागरमध्ये जाहीर सभा होत आहे. त्या सभेला जात असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर निलेश राणे यांचा ताफा आला त्यावेळी ठाकरे आणि राणे या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. आणि दोन्ही गटांकडून दगडफेक आणि घोषणाबाजी सुरू झाली. दरम्यान, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. तसेच पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्यादेखील फोडल्या.
भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावेळी नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर सडकून टीका केली होती. त्याला उत्तर म्हणून निलेश राणे यांनी गुहागमध्ये आज सभेचे आयोजन केले आहे.