बनावट चावीचा वापर करून दुकानात चोरी…

डोंबिवली – बनावट चावीचा वापर करुन दुकानातून कॅश व मोबाईल चोरी करणा-या एका इसमास डोंबिवली पोलीसांनी अटक करुन त्याच्याकडून एकूण २५,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला. विकास बरबटे असे याचे नाव आहे.

फिर्यादी हे काम करत असलेले डोंबिवली पूर्वेतील नथिंग बट चिकन शॉप मध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने या बंद शॉपची बनावट चावी बनवून शॉप मधील १८०००/- रुपये रोख रक्कम आणि १०,०००/- रुपये किंमतीचा मोबाईल चोरी केला असल्याबाबत डोंबिवली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे दावडी सोनारपाडा, डोंबिवली पूर्व परिसरातून विकास बरबटेला अटक केली. तसेच त्याच्याकडून मोबाईल आणि कॅश असा एकूण २५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २, कल्याण सचिन गुंजाळ, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा विशाल वाघ, पोहवा सरनाईक, पो.अ नितीन सांगळे, पो.शि. राठोड यांनी कामगिरी केली.