महाराष्ट्र
पुण्यात सात पोलिसांचे तडकाफडकी निलंबन…

पुणे – सहकारनरगर पोलीस ठाण्यातील सात पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी हे निलंबन केले.

शहरात गुंड टोळक्यांकडून कोयते हातात घेऊन वाहनांची तोडफोड आणि दहशत माजविण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी हि कारवाई केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोज एकनाथ शेंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर विठ्ठल शेंडे, पोलीस उपनिरीक्षक हसन मकबुल मुलाणी, पोलीस उपनिरीक्षक मारूती गोविंद वाघमारे, पोलीस हवालदार संदीप जयराम पोटकुले आणि पोलीस हवालदार विनायक दत्तात्रय जांभळे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.