ठाणे
महावितरणच्या ठेकेदारावर गोळीबार…

कल्याण – महावितरणच्या ठेकेदारावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली असून, या घटनेत ठेकेदार गंभीर जखमी झाला. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उमेश साळुंखे असे या ठेकेदाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कल्याण टिटवाळा सावरकर नगरी परिसरात उमेश साळुंखे हे राहतात. ते घराबाहेर उभे असताना त्यांच्यावर अचानक गोळीबार झाला. या गोळीबारात एक गोळी त्याच्या छातीत लागल्याने ते खाली पडले. दरम्यान, हल्लेखोराने तेथून पळ काढला. गोळीचा आवाज ऐकून परिसरातील नागरीक आणि घरातील लोक बाहेर धावत आले. त्यानंतर उमेश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.