महाराष्ट्र
‘अनुपमा’फेम नितेश पांडे यांचे निधन…

नाशिक – प्रसिद्ध अभिनेता नितेश पांडे यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या ५१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नितेश पांडे हे शूटिंगसाठी इगतपुरीला गेले होते. त्यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
नितेश पांडे यांनी अनेक मालिका आणि सिनेमात काम केले आहे. ‘अनुपमा’ या मालिकेत त्यांनी रुपाली गांगुलीची मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका साकारली होती. तसेच ओम शांती ओम या सिनेमात त्यांनी काम केले आहे.
याशिवाय प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यार, मंजिले अपनी अपनी, अस्तित्व एक प्रेम कहानी, साया, जुस्तजू, दुर्गा नंदिनी अशा अनेक मालिकेत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या.