मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कंटेनरची ६ वाहनांना धडक…

मुंबई – मुंबई पुणे एक्सप्रेस वे-वर मुंबई लेनवर कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने ६ वाहनांना धडक दिल्याने अपघात झाला. कंटेनर ची धडक एवढी जबरदस्त होती कि या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले. तर अन्य ३ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. त्यावेळी कंटेनर मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर किलोमीटर 36 /800 या ठिकाणी आल्यावर कंटेनरचा ब्रेक फेल झाला. आणि या कंटेनरने ६ वाहनांना धडक दिली. कंटेनर ची धडक एवढी जबरदस्त होती की धडक दिलेल्या वाहनातील प्रवाशांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या.
अपघात झाल्याचे समजताच आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पॉलिसी यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, आरटीओ, लोकमान्य ॲम्बुलन्स यंत्रणा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची टीम घटनास्थळी पोचली. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघात घडल्यानंतर कंटेनर चालकाने कंटेनर घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणेने त्याला ताब्यात घेतले.