दिवा आणि मुंब्रा परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद राहणार…

ठाणे – ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम होणार असल्याने दिवा- मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या कल्याण फाटा ते शंकर मंदिर या परिसरातील पाणी पुरवठा बुधवार, १० मे रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत बंद राहणार आहे.
या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दुरुस्तीच्या काळात निर्मल नगरी, रामेश्वर पार्क, दोस्ती संकुल परिसर, भोलेनाथ नगर, रोझ नगर, एम एम व्हॅली परिसर, कादर पॅलेस ते किस्मत कॉलनी, चांद नगर परिसर, खडी मशीन रोड, शिवाजी नगर परिसर आदी भागातील पाणी पुरवठा बंद राहील.
पाणी कपातीच्या या काळात काटकसरीने पाणी वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.