देश
मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली…

नवी दिल्ली – मराठा आरक्षणासंबंधी पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने राज्य सरकारची मराठा आरक्षणाबाबतची मागणी अमान्य करत पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्य सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे.