ठाणे
कल्याणमध्ये २ गटात तुफान राडा…

कल्याण – पत्री पूल परिसरात गाडी ठोकल्याच्या वादातून २ गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली असून, यात १ तरुण जखमी झाला.
याबाबत वृत्त असे आहे कि, पत्री पुलाच्या दिशेने १ कार येत होती त्या कारला ट्रकने धडक दिली. याच कारणावरून कार चालक आणि ट्रक चालक या दोघांमध्ये वाद सुरु झाला. त्यावेळी तेथील स्थानिक तरुणांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र दोन गट आपापसात भिडले. आणि दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. या घटनेत गाडी चालक जखमी झाला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रण आणली. आणि काही जणांना ताब्यात घेतले.