मुंबई
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…

मुंबई – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना नालासोपारा पूर्वेत घडली असून, सदर प्रकरणी गुन्हे शाखा कक्ष ३ विरार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी किराणा दुकानातून साखर घेऊन घरी जात असताना एका अनोळखी इसमाने तिला आवाज दिला आणि तिला खेचत आडोश्याला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
सदर बाबत तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेश येथून आरोपीला अटक केली.