डोंबिवली
विद्यार्थ्यांनी केली वाहतूक नियमांबाबत जनजागृती…

डोंबिवली – 33 वे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली.

मॉडेल कॉलेज, डोंबिवली पूर्व येथील NSS च्या विद्यार्थ्यांनी दीनदयाळ चौक, मच्छी मार्केट, डोंबिवली (पश्चिम) रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या बाजूला वाहतूक नियम पाळणे किती महत्वाचे आहे याबाबत जनजागृती करणारे पथनाट्य सादर केले.

कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक उमेश गित्ते (डोंबिवली वाहतूक उपविभाग), वाहतूक विभागातील इतर कर्मचारी, मॉडेल कॉलेजचे प्रा.योगेश शिखरे, सेफ्टी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विशाल शेटे, वेदांत प्रकाशन, डोंबिवलीच्या प्रमुख सुप्रिया कुलकर्णी उपस्थित होते.