२०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त…

मुंबई – भारतीय चलनाच्या २०० रुपये दराच्या ३०० बनावट नोटा मालवणी पोलिसांनी जप्त करून एकास अटक केली. हनीफ शेख असे याचे नाव आहे.
मालवणी परिसरात रिक्षा पार्किंग, अंबुजवाडी येथे बनावट नोटा वितरित करण्यासाठी एका इसम येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून हनीफ शेख यास अटक केली.
पोलिसांनी त्याच्याकडून ६०,०००/- रुपये किंमतीच्या २०० रुपये दराच्या ३०० बनावट नोटा तसेच नायगाव येथून बनावट नोटा छपाई करण्याकरीता लागणारे साहित्य (संगणक, क़लर प्रिंटर, लॅमिलेशन मशिन, हेअर ड्रायर, कोरे बटर पेपर, एका बाजुने नोट छपाई केलेला पेपर, कटर, पट्टी, डिंक, पेनड्राईव, कार्डरिडर) जप्त केले. तसेच मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.